सावधान ! दिवाळीआधी ते भोंदूबाबा तुमच्या घरी येतील

 राज्याच्या जनतेने सावध राहून व्यवस्थित आणि योग्य  निर्णय घेण्याची गरज आहे, कारण दसऱ्यानंतर आणि दिवाळी आधी ते भोंदूबाबा तुमच्या दारावर धडक देऊ शकतात.

Updated: Jul 6, 2014, 09:38 AM IST
सावधान ! दिवाळीआधी ते भोंदूबाबा तुमच्या घरी येतील title=

मुंबई : राज्याच्या जनतेने सावध राहून व्यवस्थित आणि योग्य  निर्णय घेण्याची गरज आहे, कारण दसऱ्यानंतर आणि दिवाळी आधी ते भोंदूबाबा तुमच्या दारावर धडक देऊ शकतात.

कारण राज्याच्या विधानसभेची मुदत 7 डिसेंबर रोजी संपतेय. विधानसभेची निवडणूक कधी होईल हे अजूनही स्पष्ट झालेलं नसलं तरी, दसरा झाल्यानंतर आणि दिवाळी सुरू होण्यापूर्वी निवडणुका होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

यावरून दसरा दिवाळी दरम्यान पांढऱ्या कपड्यातले लोकशाहीतले काही भोंदू बाबा घरी येण्याची शक्यता वाढली आहे. २८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेची मुदत ७ डिसेंबर रोजी संपत आहे.

सोमवारी ७ जुलैपासून सुरू होत असलेले संसदेचे अधिवेशन १४ ऑगस्ट रोजी संपणार असून त्यानंतर आठवडाभराच्या आतच महाराष्ट्रसह हरयाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, अरुणाचल प्रदेश आणि केंद्रातील मोदी सरकारची इच्छा असल्यास दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.  मात्र, याबाबत मोदी सरकारने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.