शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता

शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे याविषयी आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं समजतंय. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते दिल्लीहून मुंबईकडे निघाले आहेत. भाजप नेत्यांनी युती तुटण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Updated: Sep 25, 2014, 08:32 PM IST
शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता title=

मुंबई : शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्धव ठाकरे याविषयी आपल्या पक्षातील नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं समजतंय. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते दिल्लीहून मुंबईकडे निघाले आहेत. भाजप नेत्यांनी युती तुटण्याचे संकेत दिल्यानंतर शिवसेनेकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

या आधी आमच्या सोबत येणाऱ्या घटकपक्षांसोबत आम्ही आहोत, भाजप आणि घटकपक्षमिळून आम्ही पुढच्या मार्गाला निघालो असल्याचं सांगून भाजप नेत्यांनी युती तुटल्याचे संकेत दिले. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आता भाजप शिवसेनेसोबत नसल्याचं सांगितलं. मात्र आपण शिवसेनेवर कोणतीही टीका करणार नसल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं, आता शिवसेनेच्या भूमिकेवर सर्वांचं लक्ष लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.