मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक रद्द

Updated: Jun 6, 2015, 08:09 PM IST
मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक रद्द  title=

 

मुंबई : मध्य रेल्वेच्या डीसी ते एसी विद्युत परिवर्तानाचं आज मध्यरात्री करण्यात येणारे काम रद्द करण्यात आले आहे. शुक्रवारी घेण्यात आलेल्या चाचणी दरम्यान अनेक गाड्या रद्द झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. 

सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याशिवाय डीसी ते एसी विद्युत परिवर्तनाचे काम करण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. 

परिवर्तनाच्या कामासाठी आज रात्री १०.४५ ते रविवारी पहाटे ६.१५ वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार होता. पण तो आता रद्द करण्यात आला आहे. 

मध्य रेल्वेच्या सीएसटी ते मुंब्रा स्टेशनदरम्यान हा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.