मुंबई : मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी... आज रात्रीपासूनच रविवारी सकाळपर्यंत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज रात्री मध्य रेल्वेवर प्रवास करणं प्रवाशांनी टाळावं, असं आवाहन करण्यात आलंय.
शनिवारी रात्री १०.४५ नंतर सीएसटी स्थानकातून एकही लोकल सुटणार नाही... तर रात्री १२.१० आणि १२.३० वाजता डिझेल इंजिन असलेली डीएमयू सोडली जाणार आहे. शनिवारी रात्री १०.४५ नंतर ठाणे आणि कल्याणहून विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत... तर कर्जत - कसाराहून पहाटे ३.३० च्या सुमारास सीएसटीच्या दिशेने डीएमयू सोडली जाणार आहे.
कल्याण आणि ठाणे इथून सकाळी ६.०० नंतर लोकल सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री लोकलने प्रवास करणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.
‘बेस्ट’ आली धावून!
महत्त्वाचं म्हणजे मध्य रेल्वेवर आज रात्री घेण्यात येणाऱ्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टतर्फे मध्यरात्री फोर्ट ते मुलुंडदरम्यान जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार ७ मर्यादीत, ३६८, २७, ३०२ या मार्गावर जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.