मुंबई : रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी जोगेश्वरी डाउन स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी 4 पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य आणि हार्बर मार्गावरही अभियांत्रिकी कारणासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रल्वेच्या कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गावर तर हार्बरवर कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान अप डाउन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे कल्याण-ठाणे धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे मेगाब्लॉकच्या दरम्यान गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा या स्थानकांमध्ये थांबणार नाहीत. दरम्यान प्रवाशांना डाउन मार्गाने प्रवास करण्याची मुभा रेल्वेनं दिली आहे
हार्बरवर मेगाब्लॉक दरम्यान सीएसटी ते पनवेलदिशेकडील अप आणि डाउन दोन्ही मार्गावरील सेवा बंद असतील. दरम्यान प्रवाशांच्या सोईसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.