संजय दत्तची शिक्षा माफ होऊ शकते?

संजय दत्तची शिक्षा कमी, अथवा माफ होऊ शकते, कारण केंद्रीय गृहमंत्रालयाने संजय दत्तची कारागृहात वागणूक कशी आहे, याविषयी राज्य सरकारकडून माहिती मागितली आहे. 

Updated: Jan 12, 2015, 11:57 AM IST
संजय दत्तची शिक्षा माफ होऊ शकते? title=

नवी दिल्ली : संजय दत्तची शिक्षा कमी, अथवा माफ होऊ शकते, कारण केंद्रीय गृहमंत्रालयाने संजय दत्तची कारागृहात वागणूक कशी आहे, याविषयी राज्य सरकारकडून माहिती मागितली आहे. 

माजी न्यायमूर्ती काटजू यांनी २०१३ मध्ये संजय दत्तची वागणूक चांगली आहे, त्याची उर्वरित शिक्षा माफ करावी, अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली होती. 

हे पत्र राष्ट्रपतींनी तत्कालीन गृहमंत्रालयाकडे मत मागवण्यासाठी पाठवलं होतं, यावरून आता केंद्रीय गृहमंत्रालयाने संजय दत्तची कारागृहातील वर्तवणूक कशी आहे, याविषयी राज्य सरकारकडे माहिती मागवली आहे.

संजय दत्तला शिक्षा कशासाठी?
न्यायालयानं संजय दत्तला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवलं. यानंतर संजय दत्तची १६ मे २०१३ ला  येरवडा कारागृहात रवानगी झाली. त्यानंतर, मे २०१३, ते मे २०१४ या वर्षभरात तो तब्बल ११८ दिवस पॅरोल आणि फर्लोच्या रजेवर तुरुंगाबाहेर राहिला.
 
परंतु या काळात तो वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, चित्रपटांच्या शूटिंगमध्ये दिसला. संजय दत्त स्वतःच्या तब्येतीचं, मग पत्नी मान्यताच्या तब्येतीचं कारण देऊन त्यानं तीन वेळा २८ दिवसांची सुटी घेतली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.