मुंबई : मुंबईमध्ये हक्काचे घर घेऊ पाहण्याऱ्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या मुंबईमधील घरांची सोडत येत्या मे महिन्याक निघणार आहे.
यासाठीची म्हाडाची जाहिरात ७ अथवा १३ एप्रिल रोजी निघण्याची शक्यता आहे. ३१ मेला मुंबईतील ११०० घरांसाठी ही सोडत निघणार आहे. म्हाडाने यावेळी गोरेगाव, मुलुंड, चारकोप आणि बोरिवली येथील घरांचा समावेश केलाय. यासाठी अर्जदार एप्रिल महिन्यात अर्ज करु शकतात.
यात अत्यल्प, उल्प, मध्यम आणि उच्च गटाचा समावेश आहे. अत्यल्प गटासाठी घरांच्या अंदाजित किंमती १८ ते २२ लाख असण्याची शक्यता आहे. तर अत्यल्प गटासाठी २५ ते ३० लाख, मध्यम गटासाठी ५० ते ६० आणि उच्च गटासाठी ८० ते ९० लाख असण्याची शक्यता आहे.