इंद्राणीनं नाही तर भाऊ मिखाईलनं धाडला होता राजीनाम्याचा 'ई-मेल'!

इंद्राणी मुखर्जी हिनं नाही तर शीना बोरा हिचा भाऊ मिखाईल बोरा यानंच शीनाच्या राजीनाम्याचा मेल धाडल्याचं आता समोर येतंय.

Updated: Aug 29, 2015, 02:03 PM IST
इंद्राणीनं नाही तर भाऊ मिखाईलनं धाडला होता राजीनाम्याचा 'ई-मेल'! title=

मुंबई : इंद्राणी मुखर्जी हिनं नाही तर शीना बोरा हिचा भाऊ मिखाईल बोरा यानंच शीनाच्या राजीनाम्याचा मेल धाडल्याचं आता समोर येतंय.

एका वर्तमानपत्राच्या म्हणण्यानुसार, २४ वर्षीय शीनाची हत्या झाली त्यावेळी ती 'मुंबई मेट्रो वन प्रा. लि'मध्ये काम करत होती. शीनाच्या हत्येनंतर १३ दिवसांनी मिखाईलनंच राजीनाम्याचा मेल तिच्या ऑफिसमध्ये धाडला होता, अशी माहिती मिखाईलच्या नातेवाईकांनी दिलीय. 

अधिक वाचा : शीना बोरा हत्याकांड आत्तापर्यंत... 

इंद्रानीनं मिखाईलला त्याचा १२ हजार रुपयांचा महिन्याचा पॉकेटमनी न देण्याची धमकी दिली होती. तसंच आपण सांगू तसं केलं तर त्याचा मोबदला म्हणून खूप पैसे देण्याचंही सांगितलं होतं... शीना गायब झाल्यानंतर मिखाईल अनेकदा तिचं फेसबुक पेज ओपन करून तासनतास त्याकडे पाहत बसत होता... त्याला तिची खूप आठवण येत होती... लहानपणापासून हे दोघं भाऊ-बहिण एकमेकांच्या खूप जवळ होते, असाही दावा त्यांनी केलाय.  
 
शीनाचा खून झाला तेव्हा मिखाईल होता मुंबईत
शीनाचा भाऊ मिखाईल बोरा यानं केलेल्या दाव्यानुसार, ज्या दिवशी शीनाचा खून झाला त्यादिवशीही तो मुंबईतच होता.... आणि याच दिवशी शीनाप्रमाणेच त्यालाही ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता.

शीनाचा खून झाला त्यादिवशी म्हणजेच २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाला भेटायला जाण्याअगोदर आई इंद्राणी आणि संजीव खन्ना (इंद्राणीचा दुसरा पती) यांनी आपल्याला वरळीच्या एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं. इथे त्यांनी मला काही तरी पदार्थ प्यायला दिला होता... त्यानंतर ते शीनाला भेटण्यासाठी निघून गेले. पण, त्यांना परतण्यापूर्वीच नशेतच मी तिथून पळ काढला... त्यामुळे, त्या दिवशी मी वाचलो असं मिखाईलनं पोलिसांसमोर म्हटलंय. पोलीस मिखाईलच्या या दाव्याची चौकशी करत आहेत. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.