www. 24taas.com, झी मीडिया, मुंबई
पोलीस सचिन सूर्यवंशी यांना पाच आमदारांनी मारहाण केली होती. मारहाण केलेल्या निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेतल्याचे आज विधानसभेत करण्यात आली.
काही सर्वपक्षीय आमदांनी सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात मारहाण केली होती. या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांना निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, त्याआधीच त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
भारिप आमदार क्षितीज ठाकूर, मनसे आमदार राम कदम, शिवसेनेचे राजन साळवी, काँग्रेस वीरेंद्र जगताप, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जयस्वाल यांच्यासह १४ आमदारांनी मारहाण केल्याची तक्रार मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात करण्यात आली होती. या आमदारांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अहवालानंतर भारिप आमदार क्षितीज ठाकूर, मनसे आमदार राम कदम, शिवसेनेचे राजन साळवी, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल यांच्यावर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मागणी केली होती. पाच आमदारांमध्ये मनसेचे राम कदम, बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल आणि शिवसेनेचे राजन साळवी यांचा समावेश होता. त्यापैकी राम कदम आणि क्षितीज ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.