मनसेकडून शिवाजी पार्कचा बदला विलेपार्ल्यात...

शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेनं महापालिकेच्या माध्यमातून डिस्कनेक्ट केलेल्या वायफायचा बदला विलेपार्ल्यात घेण्याची तयारी मनसेनं केलीय.आज राज ठाकरे यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ विलेपाल्यात होतोय.

Updated: Jul 13, 2014, 09:27 PM IST
मनसेकडून शिवाजी पार्कचा बदला विलेपार्ल्यात... title=

मुंबई : शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेनं महापालिकेच्या माध्यमातून डिस्कनेक्ट केलेल्या वायफायचा बदला विलेपार्ल्यात घेण्याची तयारी मनसेनं केलीय.आज राज ठाकरे यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ विलेपाल्यात होतोय.

या मुंबापुरीत शिवसेना-मनसे पुन्हा आमने सामने आले आहेत. यावेळी मुद्दा वायफाय सुविधेचा आहे.

नागरिकांना विषेशतः युवकांना वायफाय देण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा रंगलीय, त्याच स्पर्धेतून एकमेकांचे वायफाय अनधिकृत ठरवले जातायत.

या राड्याचा पहिला अंक रंगला शिवाजी पार्कमध्ये, मनसेतर्फे शिवाजी पार्कमध्ये सुरू करण्यात येणारं वायफाय शिवसेनेनं महापालिकेच्या माध्यमातून डिस्कनेक्ट केलं. त्यामुळे चिडलेल्या मनसेनं विलेपार्ल्यात तातडीनं या सुविधेसाठी यंत्रणा उभी केली.

कुठलंही खोदकाम न करता वायफायच्या नेटवर्कसाठी इमारतींवरुन केबल टाकण्याचं काम पूर्ण करण्यात आलं.

प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, जॉर्गस ट्रॅक, शहाजीराजे भोसले मार्ग, हनुमान रोड या ठिकाणी नागरिकांना वायफायची सुविधा विनामूल्य उपलब्ध होणार आहे. तर या वायफायचा स्पीड दोन एमबीपीएस असेल... मोबईलधारकाला इंटरनेटवरुन अनलिमिटेड डाऊनलोड सुविधा मिळणार आहे.

मनसेच्या या उपक्रमला महापालिका आणि पोलिसांची परवानगी नसल्याचा दावा शिवसेनेनं केलाय, त्याचबरोबर रविवारच्या राज ठाकरेंच्या कार्यक्रमालाही शिवसेनेनं विरोध केलाय.
 
तर दुसरीकडे शिवसेनेच्या विरोधाला किंमत न देता हा उपक्रम करुनच दाखवणार, असा निर्धार मनसेनं केलाय.
 
शिवाजी पार्कमध्ये वायफायवरुन राडा झाल्यावर आता विलेपार्ल्यात त्याचा पुढचा अंक पहायला मिळण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे या वादात महापालिका आणि पोलीस नेमकी काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.