मनसे तटस्थ, समिती पदे सेना-भाजपच्या वाट्याला

मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेनेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. स्थायी समितीवर सेना तर शिक्षण समिती भाजपला मिळाली. दरम्यान, या निवडणुकीत मनसे तटस्थ राहिली.

Updated: Apr 7, 2015, 09:15 AM IST
मनसे तटस्थ, समिती पदे सेना-भाजपच्या वाट्याला title=

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण आणि स्थायी समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेनेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. स्थायी समितीवर सेना तर शिक्षण समिती भाजपला मिळाली. दरम्यान, या निवडणुकीत मनसे तटस्थ राहिली.

शिक्षण समितीवर कांग्रेसच्या विन्नी डिसोझा यांचा पराभव करत भाजपच्या रितु तावडे यांची निवड झाली आहे तर स्थायी समितीवर पुन्हा एकदा शिवसेनेचे यशोधर फणसे यांची निवड झालीये त्यानी कांग्रेसच्या उमेदवार वकारुनिस्सा अन्सारी यांचा पराभव केला. 

या दोन्ही निवडणुकीत समाजवादी पार्टीचे नगरसेवक तटस्थ होते तर मनसे नगरसेवक या मतदानाच्या वेळी अनुऊपस्थित राहिले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.