काय म्हणावं या विद्यार्थ्याला, अभ्यास न करता पास होण्यासाठी हे काय केलं?

अभ्यास न करता पैसै देऊनही चांगले मार्क मिळतात. भ्रष्टाचाराचं बीज खोलवर रूजलेल्या आपल्या व्यवस्थेचा परिणाम विद्यार्थ्यांवरही कसा होतो याचं एक जळजळीत सत्य समोर आलंय. अभ्यास न करता पैसे देऊनही चांगले मार्क मिळू शकतात, असा विचार केलेल्या एका विद्यार्थ्याने काय प्रताप केलेत पाहा.  

Updated: Jun 26, 2015, 10:01 PM IST
काय म्हणावं या विद्यार्थ्याला, अभ्यास न करता पास होण्यासाठी हे काय केलं?

दीपाली जगताप, मुंबई : अभ्यास न करता पैसै देऊनही चांगले मार्क मिळतात. भ्रष्टाचाराचं बीज खोलवर रूजलेल्या आपल्या व्यवस्थेचा परिणाम विद्यार्थ्यांवरही कसा होतो याचं एक जळजळीत सत्य समोर आलंय. अभ्यास न करता पैसे देऊनही चांगले मार्क मिळू शकतात, असा विचार केलेल्या एका विद्यार्थ्याने काय प्रताप केलेत पाहा.  

नुकतीच दहावी आणि बारावीची परीक्षा झालीय. निकालही जाहीर झालेत. ज्यांनी जास्तीत जास्त मार्क मिळवले त्यांना हवं ते कॉलेज मिळालं. ज्यांना नाही मिळाले त्यांच्या पालकांनी डोनेशन्स भरून प्रवेश घेतले. आता ज्या व्यवस्थेत हे शक्य आहे, त्या व्यवस्थेत पैसे देऊन चांगले मार्कही मिळवता येतील असं एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं तर?

बारावीच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने चक्क आपल्या उत्तर पत्रिकेत पाचशे रूपयांची नोट ठेवली. सायनशास्त्राच्या विषयात ४५ मार्क मिळावे यासाठी त्याने पाचशे रूपयांची नोट ठेवली. सोबत उत्तर पत्रिका तपासणाऱ्या शिक्षकासाठी त्याने विनंती अर्जही लिहिला होता. 

केमिकल इंजिनिअर होण्यासाठी अमेरिकेच्या एका विद्यापीठात अर्ज केलाय. त्यासाठी मला केमिस्ट्रीमध्ये ७० मार्क आवश्यक आहेत. म्हणून मी तुम्हाला भीक मागतो की, मला ४५ हून अधिक मार्क देणे. तरंच मला अमेरिकेतल्या विद्यापीठात प्रवेश मिळेल. अमेरिकेत शिकायला जाणे हे माझे लहानपणापासूनचे ध्येय आहे. त्यामुळे माझी ही तुम्हाला विनंती आहे. 

मुंबई एसएससी बोर्डाकडून झालेल्या चौकशीच ही बाब स्पष्ट झालीय. पैसे दिले की आपल्याकडे कामं होतात ही मानसिकता समाजात खोलवर रूजलीय. त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवरही व्हायला लागलाय. त्याचाच हा परिणाम मानला जात आहे. नियमानुसार आता या विद्यार्थ्याला पुढच्या वर्षीही परीक्षा देता येणार नाही. पण विद्यार्थ्याला शिक्षा देऊन संपूर्ण जबाबदारी संपते का, असा सवाल उपस्थित होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.