www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई कधी धावणार मोनो, असा प्रश्न आता विचारला जाणार नाही. कारण ही मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मोनरेलचे आवश्यक असणारे एमएमआरडीला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे मोनोरेल धावण्यासाठी सज्ज झाली आहे. मोनोचा पहिला प्रवास हा चेंबूर-वडाळा असणार आहे.
मोनोरेलचे सुरक्षा प्रमाणपत्र एमएमआरडीएला अधिकारी जी पी गर्ग यांनी सोमवारी सुपूर्द केले. त्यामुळे याबाबत लवकरच राज्य सरकारशी संपर्क करुन मोनोरेल सुरु होण्याची तारीख निश्चित करु, असं एमएमआरडीच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केलं आहे.
चेंबूर-वडाळा या पहिल्या टप्प्यात मोनोरेल जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल, अशी अपेक्षा एमएमआरडीने व्यक्त केली आहे. वडाळा-चेंबूर हे अंतर केवळ १९ मिनिटांत पार करता येईल. तिकीटांचे दर पाच ते १९ रुपयांपर्यंत असणार आहेत.
चेंबूर ते वडाळा या आठ किमीच्या पहिल्या टप्प्यात सात स्थानकं आहेत. यामध्ये वडाळा डेपो, भक्ती पार्क, मैसूर कॉलनी, भारत पेट्रोलियम, फर्टिलायझर टाऊनशिप, व्हीएनपी/आर सी मार्ग आणि चेंबूर या स्थानकांचा समावेश आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.