MTNLची साइट केली पाकने हॅक

मुंबई महानगर टेलिफ़ोन निगमची वेबसाईट हॅक झालीये. या वेबसाईटवर `हॅप्पी इंडीपेंडेन्स डे पाकिस्तान` असा मेसेज झळकतोय आणि एक कार्टून टाकण्यात आलंय. ही वेबसाईट उघडताच मॅसेज स्क्रीनवर डीसप्ले होतो.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Aug 16, 2013, 06:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महानगर टेलिफ़ोन निगमची वेबसाईट हॅक झालीये. या वेबसाईटवर `हॅप्पी इंडीपेंडेन्स डे पाकिस्तान` असा मेसेज झळकतोय आणि एक कार्टून टाकण्यात आलंय. ही वेबसाईट उघडताच मॅसेज स्क्रीनवर डीसप्ले होतो.
वेबसाईटवरून काही महत्त्वाची माहिती चोरण्यात आली आहे काय, याबाबत संभ्रम असून अधिक तपास आता पोलीस करतायेत. एमटीएनएलनं मुंबई क्राईम ब्रांचकडे याबाबत तक्रार दिलीये. सायबर सेल या प्रकरणाकडे तपासाची सूत्रं देण्यात आली आहेत.
याबाबत अद्याप एमटीएनएलकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी यामागे पाकिस्तानी हॅकर्स असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही देशातील सर्वात मोठे दूरसंचार जाळे असलेली सरकारी कंपनी आहे. मुंबई आणि दिल्ली या प्रमुख महानगरांमध्ये या कंपनीचे लाखो ग्राहक आहेत. त्यामुळेच या कंपनीच्या वेबसाइटवरील डेटा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असून एमटीएनएल मुंबईची साइट हॅक झाल्याने साऱ्यांचेच धाबे दणाणले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.