मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशवाद्यांच्या निशान्यावर असल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतातील प्रमुख शहरांवर हल्ले करु शकते. पण मुंबई ही त्यांच्या मुख्य निशान्यावर आहे. २६/११ हल्ल्यामागे असणाऱ्या या दहशतवादी संघटनेकडून मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी सुरु आहे. गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यानंतर मुंबईतील सर्व मुख्य वास्तू आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी जैश-ए-मोहम्मद ही संघटना आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत आहे. २६/११ सारखा हल्ला करण्याच्या तयारीत ही संघटना आहे. हॉटेल्स, मॉल्स, मंदिर, गर्दीची ठिकाणे येथील सुरक्षा मुंबई पोलिसांनी वाढवली आहे.
सिद्धिविनायक मंदिरांची सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. ATS क्राइम ब्रांच मुंबई पोलीस मंदिरांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे. संशयितांवर पोलिसांची खास नजर असणार आहे. मुंबई एयरपोर्ट, रेल्वे स्थानके, हॉटेल, मार्केट, मंदिरे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त आणि सुरक्षा ठेवण्यात आली आहे.