www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
दक्षिण मुंबईत बॅलार्ड पिअर परिसरातल्या एक्सचेंज या तीन मजली इमारतीला मोठी आग लागली. या इमारतीत बारा महत्त्वाची सरकारी कार्यालये आहेत. आग विझवण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाच्या ७ गाड्या आणि ५ पाण्याचे टॅंकर दाखल झालेत.
आगीचे वृत्त कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. दम्यान, इमारतीमधील नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे. सात गाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू होते.
आग लागलेल्या ठिकाणी असलेला पेट्रोल पंप खाली करण्यात आला. सुरक्षेचा उपाय म्हणून पेट्रोल पंपावरील काम बंद करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारितली जनगणना, नार्कोटिक्स आदी महत्त्वाची कार्यालये आहेत. एक्सचेंज इमारती जवळच आयकर विभागाचे एक कार्यालय आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा अग्नीशामन दलाने केलाय.
*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.