मुंबई कोस्टल रोडचा मार्ग अखेर मोकळा

शहरातील कोस्टल रोडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 7, 2017, 08:32 PM IST
मुंबई कोस्टल रोडचा मार्ग अखेर मोकळा title=

मुंबई : शहरातील कोस्टल रोडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. 

सर्व खात्यांची कोस्टल रोड प्रकल्पाला परवानगी यापूर्वीच मिळाली होती. मात्र केंद्रीय पर्यावरण खात्याच्या मंजुरी येणं बाकी होतं. मात्र आता पर्यावरण खात्याकडूनही हिरवा कंदिल मिळाल्यामुळं हा प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाले आहेत.

महापालिकेच्या अखत्यारीत असलेला हा तब्बल १५ हजार कोटींचा प्रकल्प आहे. नरिमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंत २९.२ किलोमीटरचा हा कोस्टल रोड असणार आहे.