'माझ्या आयुष्यातली ती सात वर्ष मला परत हवीत'

माझ्या आयुष्यातले ती सात वर्ष मला परत करा... सर्वांना निरुत्तर करणारी ही मागणई करत आहेत, चुकीच्या आरोपाखाली सात वर्षांचा तुरुंगवास भोगलेला एक व्यक्ती... कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला या व्यक्तीनं वरच्या न्यायालयात आव्हान दिलं. तिथे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, दरम्यानच्या काळात, त्यानं त्याच्या आयुष्यातली महत्त्वाची सात वर्षं तुरुंगात खितपत घालवली होती. 

Updated: Jul 8, 2015, 03:36 PM IST
'माझ्या आयुष्यातली ती सात वर्ष मला परत हवीत'  title=

मुंबई : माझ्या आयुष्यातले ती सात वर्ष मला परत करा... सर्वांना निरुत्तर करणारी ही मागणई करत आहेत, चुकीच्या आरोपाखाली सात वर्षांचा तुरुंगवास भोगलेला एक व्यक्ती... कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला या व्यक्तीनं वरच्या न्यायालयात आव्हान दिलं. तिथे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र, दरम्यानच्या काळात, त्यानं त्याच्या आयुष्यातली महत्त्वाची सात वर्षं तुरुंगात खितपत घालवली होती. 

नागपूरमध्ये राहणारे गोपाल रामदास शेट्ये... स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी ते दहा वर्षांपूर्वी मुंबईला आले. मात्र, इथे त्यांचं भविष्य साकारण्याऐवजी, पुरतं उद्ध्वस्त झालं. कारण 19 जुलै 2009 रोजी मुंबईत घाटकोपर रेल्वे स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाला होता. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी २९ जुलै २००९ रोजी बलात्काराच्या आरोपावरुन गोपाल शेट्ये यांना अटक केली. 

गोपाल शेट्ये यांनी वेळोवेळी आपण निर्दोष असल्याचं ओरडून ओरडून सांगितलं. मात्र पोलिसांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. आणि पोलिसांनी ठेवलेल्या आरोपांवरुन, सत्र न्यायालयानं गोपाल शेट्ये यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली. दरम्यानच्या काळात उच्च न्यायालयात त्यांनी दाद मागितली होती. त्या खटल्यात न्यायालयानं शेट्ये यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावत, त्यांना निर्दोष घोषित केलं. मात्र, हा निकाल आला त्यावेळी गोपाल शेट्ये यांची सात वर्षांची शिक्षा भोगून पूर्ण झाली होती. 

मात्र, निर्दोष असल्याचा आनंद गोपाळ शेट्ये यांना सुखावत नाही. कारण खोट्या आरोपाखाली फसवल्यामुळे, तुरुंगात घालवलेला सात वर्षांचा काळ परत कोणतं न्यायालय मिळवून देणार? हाच प्रश्न त्यांना दिवसरात्र सतावत आहे. यासाठी त्यांची एक वेगळीच लढाई सुरू झालीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.