मुंबईतील रेल्वे प्रश्नांवर तातडीने उपाययोजना - रेल्वेमंत्री

 मुंबईतील रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

Updated: Jan 2, 2015, 02:41 PM IST
मुंबईतील रेल्वे प्रश्नांवर तातडीने उपाययोजना - रेल्वेमंत्री title=

मुंबई : मुंबईतील रेल्वे प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या आजच्या गोंधळाबाबत तेथील समस्या जाणून घेण्यासाठी ९ जानेवारीला सुरेश प्रभू देणार ठाण्याला भेट देणार आहेत. ते यावेळी मध्य रेल्वेच्या परिस्थितीचा घेणार आढावा घेणार आहेत.

मुंबईतील उपनगरी रेल्वे वाहतुकीवरील ताण प्रचंड वाढला आहे. याकडे दुर्लक्ष झाले. यावर तातडीने उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जात आहे. समस्या मार्गी लावण्यासाठी काही वेळ लागेल. मुंबईतील लोकल प्रवाशांच्या उद्रेकावर प्रभू यांनी ट्‌विटरवरून प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज्यातील रेल्वेच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या साथीत काम केले जाईल. यासंदर्भात मुख्यमंत्रीफडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. तसेच खासदारांशीही बोललो आहे. त्यानुसार लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे ते म्हणालेत.

मुंबईतील लोकलची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. फलाटांची उंची वाढविण्याची मागणी असो वा सुरक्षिततेची, यावर फारशा ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या ट्‌विटवरही अनेक युझर्सने असे प्रश्‍न उपस्थित करत यावर काही उपाय सुचविण्यासही सुरुवात केली आहे.

----------------------------

----------------------------

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.