मुंबई : सकाळी सकाळी मुंबईकरांसाठी गुडन्यूज. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लांब पल्ल्याचा लोकल प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे.
मुंबई रेल्ले विकास महामंडळानं उपनगरीय लोकल सेवेचं चार विभागात विभाजन करण्याचा नवा आराखडा तयार केलाय. लंडनच्या धर्तीवर हे विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे.
नव्या प्रस्तावामुळे सध्याच्या 30 लाख मासिक पासधारकांपैकी 37 टक्के प्रवाशांचा खर्च कमी होईल असा प्रस्ताव मेट्रो विकास महामंडळाचा दावा आहे. नव्या प्रस्तावात लोकल प्रवाशांच्या खिशावरचा ताण कमी होणार असला, तरी रेल्वेचा महसूल मात्र तब्बल 912 कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज आहे.
विशेष म्हणजे या नव्या प्रस्तावाचा फायदा कल्याण आणि विरारच्या पलिकडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे.