मुलुंडमध्ये किरीट सोमय्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटप असल्याचे वृत्त!

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये राजकीय चिखलफेकीचं सत्र सुरुच आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास भाजप खासदार किरीट सोमय्या आपल्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटण्यासाठी आले असल्याची माहिती वॉर्ड क्र. 103 चे उमेदवार विजय गवई यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 17, 2017, 08:18 AM IST
मुलुंडमध्ये किरीट सोमय्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटप असल्याचे वृत्त! title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये राजकीय चिखलफेकीचं सत्र सुरुच आहे. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास भाजप खासदार किरीट सोमय्या आपल्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटण्यासाठी आले असल्याची माहिती वॉर्ड क्र. 103 चे उमेदवार विजय गवई यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली.

किरीट सोमय्या पैसे वाटप करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गवई यांनी कार्यकर्त्यांसह मुलुंड कॉलनीत उभ्या असलेल्या गाडीभोवती गराडा घालून पोलीस आणि निवडणूक यंत्रणांना पाचारण केलं. ही बातमी मुलुंडमध्ये वाऱ्यासारखी पसरली. सोमय्यांना कात्रीत पकडण्याची आयती संधी चालून आल्यानं शिवसेना खासदार राहुल शेवाळे शिवसैनिकांसह मुलुंड पोलीस ठाणे परिसरात हजर झाले.

मात्र निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला गाडीत काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. त्यामुळे पोलिसांकडून याप्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याने शेवाळे, शिवसैनिक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आल्या पावली माघारी जावं लागले. मात्र या सगळ्या ड्राम्यामुळे मुलुंडमध्ये गुरुवारी रात्री तणावाचं वातावरण पसरलं होतं. 
 
दरम्यान, या घटनेनंतर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.