www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या सुरक्षा आढाव्याचं काम पूर्ण झालंय. आता प्रमाणपत्र मिळण्याची प्रतिक्षा असून त्यानंतर लगेच मुंबईची पहिली वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो सेवेत रुजू होऊ शकेल.
रोलिंग स्टॉक, वर्कशॉप, डेपो, स्थानकं, कॉरिडोर, ट्रॅक, ओएचईची चाचणी घेण्यात आलीय. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पी.एस.बाघेल यांनी ही चाचणी घेतलीय.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या दिवशी, म्हणजेच १ मे रोजी मुंबईतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेचे रेल्वे सुरक्षा आयुक्त पी. एस. बघेल सध्या मेट्रो मार्ग, गाडय़ा आणि फलाटांची कसून तपासणी करत असून, सोमवारी या तपासणीचा अंतिम दिवस होता. त्यानंतर सुरक्षा आयुक्त आपला अहवाल सादर करून सुरक्षा प्रमाणपत्र देणार आहेत. मात्र मेट्रोचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत येण्याचा मुहूर्त १६ मे नंतरचाच आहे.
मुंबईच्या पहिल्या मेट्रो रेल्वेच्या चाचणीच्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा कंदील दाखविला होता. यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. या यशस्वी चाचणीनंतर आता सुरक्षा प्रमाणपत्रासाठी प्रयत्न आहे. लवकरच मुंबईत मेट्रो धावणार आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर अशी ही मेट्रो धावणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.