नंदिनी गोस्वामीनं स्वत: सांगितलं काय घडलं तिच्यासोबत?

लालबागच्या राजा दर्शनाला गेलेल्या तरुणीला महिला पोलिसांनी मारहाण केली. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली. नंदिनी गोस्वामी आपल्या कुटुंबियांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. ती व्हिआयपी गेटमधून जाण्याचा प्रयत्न करत होती, तिनं शिवीगाळ केली म्हणून तिला मारहाण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

Updated: Sep 29, 2015, 12:36 PM IST
नंदिनी गोस्वामीनं स्वत: सांगितलं काय घडलं तिच्यासोबत?  title=

मुंबई: लालबागच्या राजा दर्शनाला गेलेल्या तरुणीला महिला पोलिसांनी मारहाण केली. या घटनेची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली. नंदिनी गोस्वामी आपल्या कुटुंबियांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. ती व्हिआयपी गेटमधून जाण्याचा प्रयत्न करत होती, तिनं शिवीगाळ केली म्हणून तिला मारहाण झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

आणखी वाचा - व्हिडिओ - लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसाकडून तरुणीला मारहाण

पण नंदिनी गोस्वामी हिनं स्वत: झी मीडियाकडे आपली व्यथा मांडली. व्हिआयपी रांगेत पोलीसांचे नातेवाईक आणि तिथल्या स्वयंसेवकाच्या ओळखीचे लोकं सर्रास दर्शनासाठी जात होते, म्हणून आम्हीही त्या रांगेत लागलो. त्यांनी शिवीगाळ सुरू केली, आईचे कपडे फाडले म्हणून मी ओरडली, असं नंदिनी सांगते. 

ऐका नेमकं काय घडलं तेव्हा - 

 

आणखी वाचा - लालबागचा राजा: त्या रात्री नेमकं काय झालं? तरुणीला पोलिसांनी का केली मारहाण?

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.