मुंबईच्या समुद्रात पैशाचा पाऊस, हजाराच्या नोटा तरंगल्यात

मुंबईत पाण्यासारखा पैसा वाहतो असं म्हणतात. त्याचा प्रत्यय गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात आला. चक्क समुद्रात एक हजाराच्या नोटा तरंगताना दिसून आल्यात.

Updated: Aug 12, 2015, 11:09 AM IST
मुंबईच्या समुद्रात पैशाचा पाऊस, हजाराच्या नोटा तरंगल्यात title=

मुंबई : मुंबईत पाण्यासारखा पैसा वाहतो असं म्हणतात. त्याचा प्रत्यय गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात आला. चक्क समुद्रात एक हजाराच्या नोटा तरंगताना दिसून आल्यात.

गेट वे ते रेडिओ क्लबलगत असलेल्या समुद्राच्या बंधाऱ्याजवळ काल सायंकाळी चारच्या सुमारास अचानक १००० रूपयाच्या १० ते १५ नोटा तरंगताना आढळल्या. काही तरूणांनी पाण्यात उतरून त्या नोटा काढल्या. 

त्यानंतर थोड्यावेळात आणखी नोटा आढळल्या. त्यानंतर नोटा बघायला बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. अखेर पोलिसांनी पाण्यातून पैसे काढणाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र, या नोटा समुद्रात कोठून आल्यात याबाबत चर्चा सुरु होती.  

पाहा व्हिडिओ -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.