मुंबई : पोलिसांनी माणुसकी आहे, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या, अशा आशयाची जाहिरात किंवा विश्वास पोलिस दलाकडून वेळोवेळी दिला जातो.
मात्र शिना बोरा हत्येप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला घेऊन जाणाऱ्या पोलिस गाडीने, एका पोलिसालाच धडक दिली, आणि पोलिसाला तसेच सोडून पोलिस गाडी निघून देखील गेली.
जखमी पोलिस संतोष पवार यांनी आपण पोलिस असल्याचं सांगितल्यानंतर अखेर दोन पोलिसांनी त्यांना उचलून नेलं. संतोष पवार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
पोलिसांच्या गाडीने मला धडक दिली आणि ते निघून गेले, दोषींवर कारवाई होण्यासाठी आपण राकेश मारिया यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं संतोष पवार यांनी म्हटलं आहे.
इंद्राणी मुखर्जीची वांद्र्याच्या भाभा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी झाली, खार पोलिस इंद्राणीला परत महिलांच्या सांताक्रुझच्या पोलिस कोठडीत बंद करण्यासाठी आणत होते, तेव्हा हा अपघात झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.