आता एका ट्विटवर पोलिसांत तक्रार नोंदवा

सोशल मीडियावरील वाढती सक्रियता पाहता आता मुंबई पोलिसांनीही नवे ट्विटर अकाउंट सुरु केलेय. 

Updated: Dec 28, 2015, 01:18 PM IST
आता एका ट्विटवर पोलिसांत तक्रार नोंदवा title=

मुंबई : सोशल मीडियावरील वाढती सक्रियता पाहता आता मुंबई पोलिसांनीही नवे ट्विटर अकाउंट सुरु केलेय. मुंबईकर एका ट्विटद्वारे त्यांची तक्रार येथे नोंदवू शकतात. पोलिसांचे हे अधिकृत ट्विटर हँडल आजपासून सुरु करण्यात आले आहे. 

आपल्याला भेटण्यासाठी पोलीस ठाणे ही एकमेव जागा का हवी? येथे आपण दररोज भेटू असे मुंबई पोलीस ट्विटरव म्हटले आहे. तसेच आम्ही आपल्या शहराच्या सुरक्षिततेसाठी  सदैव कटीबद्ध राहू. आपल्या सूचनांचे आम्ही स्वागत करतो, असे ट्विटरवर नमूद करण्यात आलेय. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी या ट्विटर हँडलचे लाँचिगं केले. याचा फोटोही मुंबई पोलीस ट्विटरवर टाकण्यात आलाय. या अकाऊंटद्वारे नागरिक त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल करु शकतात. यामुळे गुन्ह्याची तात्काळ माहिती पोलिसांपर्यंत पोहोचू शकेल. @MumbaiPolice या नावाने मुंबई पोलिसांचे अकाउंट सुरु करण्यात आलेय. तर शहर पोलीस आयुक्तांसाठी @CPMumbaiPolice हे अकाउंट सुरु कऱण्यात आलेय.