खबरदार वाहनचालकांनो, एक्स्प्रेस हायवेवर नियमांचं उल्लंघन केलं तर...

एक्स्प्रेस हायवेवर बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणा-या वाहनचालकांनो आता सावधान. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणं आता तुम्हाला महागात पडू शकतं. 

Updated: Jun 9, 2016, 11:21 PM IST
खबरदार वाहनचालकांनो, एक्स्प्रेस हायवेवर नियमांचं उल्लंघन केलं तर... title=

मुंबई : एक्स्प्रेस हायवेवर बेदरकारपणे वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणा-या वाहनचालकांनो आता सावधान. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणं आता तुम्हाला महागात पडू शकतं. 

या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत!

वेग मर्यादा ओलांडून वाहन चालवणं, वाहन चालवताना सीट बेल्ट न लावणं, लेन कटिंग करून ओव्हरटेक करणं, नादुरुस्त वाहन रस्त्यावर चालवणं, गाडीचे टायर्स खराब असणं या आणि अशा गोष्टी आता मुंबई - पुणे एक्प्रेस हायवेवर खपवून घेतल्या जाणार नाहीत. 

खरंतर आधीपासूनच या नियमांचं काटेकोर पालन होणं अपेक्षित होतं. मात्र त्यांचं उल्लंघन करण्यातच धन्यता मानणाऱ्यांची संख्या अधिक असल्यानं एक्स्प्रेस हायवे अपघातांचा हायवे बनलाय. या पार्श्वभूमीवर रस्ते परिवहन तसेच वाहतूक पोलिसांची यंत्रणा संपूर्ण लवाजम्यासह रस्त्यावर उतरलीय.

१६ पथकं तैनात 

परिवहन तसंच वाहतूक पोलिसांची पुण्याच्या बाजूने सहा तर मुंबईच्या बाजूने १० पथकं तैनात आहेत. नियमभंग करणा-यांवर दंडात्मक तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येतेय.. गरज पडल्यास वाहनचालकाचं वाहन किंवा ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करण्यात येतंय. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीकोनातून हाती घेण्यात आलेली ही मोहीम पुढील सात दिवस राबवण्यात येणार आहे. एक्स्प्रेस हायवेवरील वाहतुकीला शिस्त लावणं हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.