अल्पवयीन मुलीवर ३ वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला अटक

मालाडच्या कुरारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. या पीडित मुलीनं आपल्याच वडिलांवर बलात्कार आणि शारीरिक शोषणाचा आरोप केलाय. पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून तो या पीडित मुलीचा सावत्र पिता आहे. 

Updated: Aug 16, 2015, 05:48 PM IST
अल्पवयीन मुलीवर ३ वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला अटक title=

मुंबई: मालाडच्या कुरारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. या पीडित मुलीनं आपल्याच वडिलांवर बलात्कार आणि शारीरिक शोषणाचा आरोप केलाय. पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून तो या पीडित मुलीचा सावत्र पिता आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून हा नराधम या मुलीवर अत्याचार करत होता. शिवाय याबाबत कुठं वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यानं दिली होती. याबाबत पीडित मुलीनं शेजाऱ्यांना सांगितल्यानंतर सारा प्रकार उघड झाला. तक्रारीनंतर पोलिसांनी नराधम सावत्र बापाला अटक केलीय.

यापूर्वी असाच दुर्दैवी प्रकार नवी मुंबईत उघड झाला होता. नवी मुंबईत शाळेत पत्र लिहून विद्यार्थिनीनं सख्या पित्याकडून होत असलेल्या अत्याचाराची कहानी सांगितली होती. यानंतर या नराधम पित्याला अटक करण्यात आली. आता ही अशीच घटना मालाडमध्ये घडलीय. 
 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.