मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये पाऊस बरसला

 मुंबईसह ठाणे, कल्याण परीसरात रिमझीम पाऊस झालाय. रायगडमध्येही सरी बरसल्यात. पावसामुळं मुंबईकरांना दिलासा मिळालाय. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय.

Updated: Jul 2, 2014, 10:46 AM IST
मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये पाऊस बरसला title=

मुंबई : मुंबईसह ठाणे, कल्याण परीसरात रिमझीम पाऊस झालाय. रायगडमध्येही सरी बरसल्यात. पावसामुळं मुंबईकरांना दिलासा मिळालाय. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय.

आज पहाटे मुंबईसह ठाणे, कल्याण परीसरातही रिमझीम पाऊस झालाय. पावसामुळं मुंबईकरांना दिलासा मिळालाय. असह्य उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. दमदार पावसाची अपेक्षा सगळेजण व्यक्त करतायेत. मंगळवार सकाळपासून लोणावळा शहरात पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावली.

आज सकाळपासूनही लोणावळ्यात पाऊस सुरु आहे. नेहमीच्या प्रमाणापेक्षा पाऊस पुरेसा नसला तरीही हे ही कमी नाही अशी भावना लोणावळेकरांनी व्यक्त करत आनंद साजरा केला. रायगडमध्येही अनेक ठिकाणी वरुणराजा बरसलाय. उरण, खालापूर, कर्जत परीसरात पाऊस झाला. गेले काही दिवस उकाड्यानं हैराण केलेलं असताना बरसलेल्या पावसामुळे रायगडकरांची उकाड्यातून सुटका झाली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.