अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : मध्य रेल्वचे लोकल वाहतुकी संदर्भातले अनेक प्रकल्प यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निदान यंदा मध्य रेल्वेच्या बाबतीत तोंडाला पाने पुसली जाणार नाही अशी आशा आहे.
गेली अनेक वर्षे मध्य रेल्वेची अपेक्षाभंग करणारा अर्थ संकल्प म्हणून रेल्वे अर्थ संकल्प ओळखला जातो. मध्य रेल्वेचे काही प्रकल्प यंदा मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.
नवीन सरकारचा हा पहिला रेल्वेअर्थ संकल्प असल्याने खूप मोठ्या अपेक्षा आहेत.
मध्य रेल्वेचा ही कर्जत खोपोली आणि कसारा, पनवेल अशी पसरली असून आता प्रवाशांची संख्या ही 38 लाखांच्या घरात पोहचली आहे. तेव्हा रेल्वेवरचा ताणही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.