निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पाहा लाइव्ह

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या महापालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत मुंबई-पुणे-नाशिक-नागपूरसह दहा महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे.

Updated: Jan 11, 2017, 04:12 PM IST

 

 

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या महापालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत मुंबई-पुणे-नाशिक-नागपूरसह दहा महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे.

दहा पालिकांसोबत 26 जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांचीही आयोगाकडून घोषणा होणार आहे. मुंबईसह राज्यात दहा पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचं समजतंय. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे मिनी विधानसभा समजल्या जाणा-या दहा पालिकांसाठी निवडणुकीच्या घोषणेमुळे राज्यात ख-या अर्थाने राजकीय रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे.