फ्रेनशीलानंतर आता कामोठेमधून १० वर्षीय मुलगी बेपत्ता

नवी मुंबईतल्या ऐरोलीमधलं फ्रेनशीला अपहरण आणि हत्येची घटना ताजी असतानाच, कामोठेमधून शुक्रवारपासून १० वर्षांची मुलगी बेपत्ता आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजलीय. 

Updated: Jul 5, 2015, 06:58 PM IST
फ्रेनशीलानंतर आता कामोठेमधून १० वर्षीय मुलगी बेपत्ता  title=

नवी मुंबई: नवी मुंबईतल्या ऐरोलीमधलं फ्रेनशीला अपहरण आणि हत्येची घटना ताजी असतानाच, कामोठेमधून शुक्रवारपासून १० वर्षांची मुलगी बेपत्ता आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजलीय. 

याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबई पोलिसांनी या घटनेची युद्धपातळीवर उकल करण्यासाठी सात पथकं स्थापन केली आहेत. प्रियंका विजयकुमार गुप्ता असं या मुलीचं नाव आहे.

गुप्ता कुटुंबीय नुकतंच उत्तरप्रदेशहून कामोठेच्या सेक्टर १२ मध्ये पुष्पलता सोसायटीमध्ये राहायला आलं आहे. दरम्यान, ऐरोलीच्या घटनेनंतर याप्रकरणात उशीर होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रियंकाचा तपास युद्धपातळीवर सुरु केला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.