सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई: नाव न घेता उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. जिकडे पाहावं तिकडे भ्रष्टाचार दिसतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावलाय. एक दिवस मराठी माणूस ठरवले तर एक हाती सत्ता ही देईल त्याचप्रमाणे सत्तेसाठी सेना काम करीत नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.
शिवसेनेतर्फे मराठी तरूणांना उद्योगासाठी टेम्पो वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. वडापावच्या गाडीवरून अनेकजण सेनेवर टीका करत असतात, पण मराठी माणसाला शिवसेनेनंच स्वाभिमान दिला, इतकंच मी टीकाकारांना सांगेन, असं ते म्हणाले.
मराठी माणूस उद्योगक्षेत्रात मागे नाही हेही सर्वांना दाखवून दिलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी तरूणांना केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.