शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी मुंबईत शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. विघ्नेश साळुंखे असं या मृत मुलाचं नाव आहे. कळंबोलीमधल्या सेंट जोसेफ शाळेचा तो विद्यार्थी होता. 

Updated: Jul 17, 2015, 04:14 PM IST
शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू  title=

नवी मुंबई: नवी मुंबईत शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. विघ्नेश साळुंखे असं या मृत मुलाचं नाव आहे. कळंबोलीमधल्या सेंट जोसेफ शाळेचा तो विद्यार्थी होता. 

मृत विघ्नेश साळुंखे इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. तो वर्गातून पडला की गॅलरीतून याबाबत शाळेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.  

काहीच महिन्यांपूर्वी पनवेलमध्ये एका विद्यार्थ्याचा खिडकीतून पडून मृत्यू झाला होता. त्यामुळं आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या शाळेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.