मुंबई : मालाडमध्ये नेव्हीची परीक्षा देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये चेंगराचेंगरी होऊन 10 पेक्षा जास्त तरुण जखमी झाले. मालाडमध्ये नव्यानं बनलेल्या INS हमलाच्या बाहेर ही दुर्घटना घडली.
नेव्हीची परीक्षा देण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी आले होते. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातले विद्यार्थी मालाडमध्ये दाखल होत होते. मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं आलेले विद्यार्थी दिसत असतानादेखील प्रशासनाकडून कुठलंही नियोजन करण्यात आलं नव्हतं. विद्यार्थी एकमेकांना ढकलून पुढं जायचा प्रयत्न करत होते. त्यातूनच ही चेंगराचेंगरी झाली.
दरम्यान, नौदलाच्या परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांवर लाठीचार्ज झालेला नाही. गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याने काही उमेदवार जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी स्पष्टीकरण देताना सांगितले. दरम्यान, नौदलाच्या परीक्षेच्या पात्रतेसाठी ५० टक्क्यांची अट होती. मात्र गर्दी पाहून ६० टक्क्याची अट केल्याने गोंधळ झाला, असे एएनआयने म्हटले आहे.
50% was the cut off, when they saw the crowd they made it 60%. When we protested police lathi charged: Student pic.twitter.com/peAvZXHcO7
— ANI (@ANI_news) September 9, 2016