"समुपदेशनाची गरज शेतक-यांना नाही, मंत्र्यांना आहे"

भाजप-शिवसेना सरकारमधील मधील मंत्री आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत. मात्र आज समुपदेशाची खरी गरज शेतकऱ्यांपेक्षा वादग्रस्त विधाने करुन, शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्यानाच जास्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

Updated: May 14, 2015, 07:12 PM IST
"समुपदेशनाची गरज शेतक-यांना नाही, मंत्र्यांना आहे" title=

मुंबई : भाजप-शिवसेना सरकारमधील मधील मंत्री आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत. मात्र आज समुपदेशाची खरी गरज शेतकऱ्यांपेक्षा वादग्रस्त विधाने करुन, शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या मंत्र्यानाच जास्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेत आले आहे. सध्या भाजपा सरकारमधील हे मंत्री मानसिक सतुंलन ढासळल्या सारखे वागत असून या मंत्र्यानी आणि नेत्यांनी वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु केली आहे. 

राज्याचे महसुलमंत्री एकनाथ खडसे एकीकडे म्हणतात की शेतकऱ्यांकडे मोबाईलचे बील भरण्यासाठी पैसे असतात मग ते वीजेचे बीज का भरु शकत नाहीत. दुसरीकडे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी शेतकऱ्यांनी आता सरकारकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये असे सांगतात. 

हेच नितीन गडकरी शेतकऱ्यांना शेतीसाठी मानवी मूत्राचा वापर करा त्यामुळे शेतीतून भरघोस उत्पादन मिळते असा शोध लावतात. त्यांचीच री ओढत कृषीमंत्री एकनाथ खडसे मल्टीप्लेक्स मधील मलमूत्राचे संकलन करुन शेतीसाठी कस् वापरता येईल यासंदर्भात सरकार प्रयत्न करणार असल्याचे सांगतात.

खरे तर  भाजपा-शिवसेना सरकार सत्तेत आल्यापासून सहाशेहून अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या असताना केंद्रीय कृषीमंत्री संसदेत महाराष्ट्रात फक्त तीनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असल्याची आणि तशी माहिती महाराष्ट्र सरकारने आपल्याकडे पाठविल्याचे सांगतात. 

यावर राज्याचे कृषीमंत्री ज्या शेतकऱ्यांनी चिठ्ठ्या लिहून ठेवल्या त्यांच्याच आत्महत्या ग्राह्य धरल्या असल्याचे सांगतात. अशा प्रकारे भाजपा सरकारमधील नेतेमंडळी नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचे काम करत असून आज याच सरकारमधील मंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आता शेतकऱ्यांना समुपदेशनाची गरज असल्याचे सांगत आहेत.

मात्र या समुपदेशनाची गरज ही शेतकऱ्यांपेक्षा भाजपा-शिवसेना सरकार मधील मंत्र्यानाच  जास्त असल्याचे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.