राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापतींविरोधात अविश्वास ठराव

आजचा दिवस हा राज्याच्या विधानपरिषद इतिहासामध्ये एक ठळक दिवस म्हणून नोंदला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणलाय. असा ठराव मांडला जाणं ही विधानपरिषदच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल. आज त्यावर चर्चा आणि मतदान होणार आहे. 

Updated: Mar 16, 2015, 09:32 AM IST
राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापतींविरोधात अविश्वास ठराव title=

मुंबई: आजचा दिवस हा राज्याच्या विधानपरिषद इतिहासामध्ये एक ठळक दिवस म्हणून नोंदला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणलाय. असा ठराव मांडला जाणं ही विधानपरिषदच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल. आज त्यावर चर्चा आणि मतदान होणार आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसनं विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाचा प्रस्ताव आज चर्चेला येणार असल्यानं दोन्ही कॉंग्रेसमधील दुफळी आणि सत्तधाऱ्यांमधील दरार स्पष्ट होणार आहे. 

जर आधीच सभापतींनी राजीनामा दिला तर चर्चा आणि मतदान होणार नाही. अर्थात राजीनामा दिला नाही तर यावर विधानपरिषदेत चर्चा होत मतदान होणार आहे. सभापतींविरोधात अविश्वासदर्शक ठराव का मांडला यावर चर्चा होताना चर्चेत राष्ट्रवादीची चांगलीच कसोटी लागणार आहे. यामध्ये भाजप सेना नक्की कोणाच्या बाजूनं मतदान करणार यावर अविश्वास ठरावाचं चित्र स्पष्ट होणार आहे.
 
 आजचा दिवस विधान परिषदेत ऐतिहासिक ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व विधानपरिषद आमदारांना सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे आदेश दिलेत. सभापतींबाबत राष्ट्रवादीनं याआधीच भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळं काँग्रेससह या विषयावर चर्चा झाली नसल्याचं तटकरेंनी सांगितलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.