३ तासांनंतर मोनो पूर्ववत, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

लोकल बंद पडणं... प्रवाशांचे हाल हे काही मुंबईकरांसाठी नवे नाही. पण मुंबईची नवी ओळख असलेली मोनोरेल बंद पडल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे मोनेरेल बंद पडलीय.

Updated: Mar 15, 2015, 04:32 PM IST
३ तासांनंतर मोनो पूर्ववत, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश title=

मुंबई : तब्बल तीन तासांनी मोनो रेल पूर्ववत झालीय. मोनो रेलमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

लोकल बंद पडणं... प्रवाशांचे हाल हे काही मुंबईकरांसाठी नवे नाही. पण मुंबईची नवी ओळख असलेली मोनोरेल बंद पडल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे मोनेरेल बंद पडलीय.

वडाळ्याहून चेंबूरकडे जाणारी मोनोरेल भक्ती पार्क स्टेशनदरम्यान अडकली. आता मोनोरेल वर उंचावर असल्यानं प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंय. 

अग्निशनम दलाचे जवान उंच शिडीचा वापर करून प्रवाशांना बाहेर काढत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.