'आरबीआय'च्या कार्यपद्धतीत मोठे बदल आवश्यक - गव्हर्नर

'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा मध्यवर्ती बँकेच्या कार्यपद्धतीत मोठे बदल आवश्यक आहेत, देशातील संपूर्ण बँकिंग क्षेत्राचे नियमन करणाऱ्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा कारभारदेखील सशक्त असायला हवा, असं मत आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

Updated: Jan 14, 2016, 09:26 PM IST
'आरबीआय'च्या कार्यपद्धतीत मोठे बदल आवश्यक - गव्हर्नर title=

मुंबई : 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा मध्यवर्ती बँकेच्या कार्यपद्धतीत मोठे बदल आवश्यक आहेत, देशातील संपूर्ण बँकिंग क्षेत्राचे नियमन करणाऱ्या 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चा कारभारदेखील सशक्त असायला हवा, असं मत आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

बँकेतील कर्मचाऱ्यांनी पारंपरिक नोकरशाही पद्धतीने काम न करता आधुनिक कार्यपद्धतीचा अवलंब करायला हवा, असे आवाहन आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला आहे. 

प्रभावी पद्धतीने काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधणे आवश्यक आहे, तसेच त्यांनी सर्व नियमांचे योग्य पालन करीत बाहेरील जगातील नवनवीन प्रवाहांची ट्रेंड्सची माहिती करुन घेणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.