www.24taas.com, मुंबई
नूतन वर्ष २०१३ च्या स्वागतासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. पण, शासकीय कर्मचार्यांतमध्ये गत वर्षात किती सुट्या मिळाल्या होत्या आणि आता नवीन वर्षात किती सुट्ट्या मिळणार याच्या चर्चा करीत असल्याचे चित्र सध्या बहुतांशी सरकारी कार्यालयात दिसू येत आहे.
राज्य शासनाने २०१३ साठी शासकीय सुट्या जाहिर केल्या असून शासकीय कर्मचार्यांचना ९५ सुट्या मिळणार आहेत. २०१३ मध्ये रविवारच्या ५२ सुट्ट्या असणार आहेत. यात एकूण २० राष्ट्रीय सुट्यांचा समावेश आहे. दर महिन्याच्या दुसर्याा आणि चौथ्या शनिवारी सरकारी कार्यालये बंद असतात. त्यामुळे सरकारी नोकरदारांना पुढील वर्षी अशा २३ बोनसच्या सुट्या मिळणार आहेत. शिवाय प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्या ला काही सुट्यांची घोषणा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
एकूण सणांमधून ६ सण रविवारी येत असल्यामुळे हा कर्मचार्यां साठी तोटाच आहे. मात्र सरत्या वर्षातील रविवारच्या सुट्यांपेक्षा एका सुट्टीने भर पडली आहे. पुढील वर्षात काही सार्वजनिक सुट्ट्या रविवारी येत असल्यामुळे या कर्मचार्यांषना त्यांच्या काही हक्काच्या सुट्यांवर पाणी सोडावे लागणार आहे. यात महाशिवरात्री(१० मार्च), बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), पारशी नववर्ष (१८ ऑगस्ट), दसरा (१३ ऑक्टोबर), दिवाळी-लक्ष्मीपूजन (३ नोब्हेंबर) आणि गुरुनानक जयंती (१७ नोव्हेंबर) या महत्वाच्या सुट्यांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) आणि बौद्ध पौर्णिमा (२५ मे) या दोन सुट्ट्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी येत असल्याने सरकारी कर्मचार्यांचना या सुट्यांवरही पाणी सोडावे लागणार आहे. पुढील वर्षी चार सुट्ट्या शुक्रवारी येत असल्यामुळे कर्मचार्यांरना तीन दिवसाचा सोय करता येणार आहे.
शुक्रवारच्या सुट्यांमध्ये ईद ए-मिलाद (२५ जानेवारी), गुडफ्रायडे (२९ मार्च), रामनवमी (१९ एप्रिल)व रमझान ईद (९ ऑगस्ट) या सुट्यांचा समावेश आहे. त्यामुळे गुरुवारच्या सायंकाळी सहपरिवार बाहेर गेल्यास तीन दिवसाची (चार रात्री) सुविधा करता येणार आहे. २०१२ मध्ये बँक कर्मचार्यां ना लेखा-जोखा पूर्ण करता यावा, यासाठी २ एप्रिल व २९ सप्टेंबर रोजी दोन अतिरिक्त सुट्ट्या देण्यात आल्या होत्या.
२०१३ साठी १ एप्रिल व ३० सप्टेंबर अशा दोन सुट्ट्या इतर कार्यालये सोडून अतिरिक्त सुट्ट्या देण्यात आल्या आहे. २०१३ मधील काही महत्वाच्या शासकीय सुट्या १९ फेब्रुवारी शिवाजी महाराज जयंती, २७ मार्च होळी, ११ एप्रिल गुडीपाडवा, २४ एप्रिल महावीर जयंती, १मे महाराष्ट्र दिन, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, ९ सप्टेंबर गणेश चतुर्थी, २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, १६ ऑक्टोबर बकरी ईद, ४ नोब्हेंबर दिवाळी (बलिप्रतिपदा), १४ नोब्हेंबर मोहरम, २५ नोब्हेंबर ख्रिसमस आदी.