महानगरांमध्ये गाडी विकत घेण्यावर बंधने

राज्यातील विशेषतः मुंबईसारख्या शहरांतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आता गाडी विकत घेण्यावर बंधने येण्याची शक्यता आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 20, 2013, 09:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील विशेषतः मुंबईसारख्या शहरांतील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आता गाडी विकत घेण्यावर बंधने येण्याची शक्यता आहे. जर पार्किंगची जागा असेल तरच गाडी विकत घेण्यासाठी परवानगी द्यावी अशा प्रकराचा प्रस्तावच राज्याच्या परिवहन विभागाने राज्य सरकारला पाठवला आहे.
किमान प्रमुख शहरांत या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याची मागणी या शिफराशीमध्ये करण्यात आलीये. राज्यात वाहनांची संख्या एक कोटी 75 लाखांपेक्षा जास्त असून एकट्या मुंबईत 19 लाखांपेक्षा जास्त आहे. मुंबईसारख्या शहरांत दररोज 300 पेक्षा जास्त नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय, प्रदुषण, मानवी वेळ वाया जाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यातच हाय-वे वगळता बहुतेक सर्व रस्त्यावंरच बाजूला वाहने पार्क केली जातात. यामुळे रस्ता अरुंद होतो, फेरिवाल्यांचे फुटपाथवर अतिक्रमण, पादचारी रस्त्यावर चालणे आणि यामुळे वाहतूकीमध्ये अडथळा निर्माण होणे अशी अडचणींची एक श्रुंखलाच तयार होत आहे.
वाहने स्वस्त झाल्याने वाहने घेणे परवडणारे ठरले आहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी पार्किंगची स्वतंत्र सोय असले, तसा पुरावा दाखवला तरच गाडी विकत घेण्यास परवनागी देण्याची शिफारस परिवहन विभागाने केलीये.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.