www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात नव्या राजकीय आघाडीचा उदय झालाय. २३ पक्षांच्या या आघाडीचं नाव महाराष्ट्र लोकशाही आघाडी असणार आहे.
प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघासह २३ पक्ष या आघाडीत आहेत. स्वतः आंबेडकर या आघाडीचे नेतृत्व करणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या आघाडीमार्फत लढवल्या जाणार आहेत. महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या बॅनरखाली उमेदवार निव़डणूक रिंगणात उतरणार आहेत. प्रकाश आंबेडकरांचा हा राजकीय प्रयोग कितपत यशस्वी ठरतो हे येणा-या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
यापूर्वी राज्यात तिस-या आघाडीचा प्रयोग करण्यात आला होता. पण हा प्रयोग सपशेल अपयशी ठरला होता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.