मुंबई : शिवसेना आणि भाजपची मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये युती होण्याची शक्यता संपली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे, पण जागावाटपाबाबत एकमत न झाल्यामुळे आता युतीच्या शक्यता मावळल्या आहेत.
उद्या भाजपचे ज्येष्ठ मंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. आता युती तुटल्याची घोषणा कोण करणार याकडे लक्ष लागलं आहे. युती तुटली असं सांगण्यापेक्षा स्वबळावर लढण्याचा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा मान राखला असं सांगण्यात येईल, अशीही माहिती आहे.