चिमुरडीचा ‘बलात्कार नव्हे विनयभंग’

मुंबईत जुहूमध्ये एका स्कूलबसमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झालेला नाही तर तिचा विनयभंग झालाय, असं स्पष्टीकरण पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी दिलं आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 19, 2013, 05:11 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत जुहूमध्ये एका स्कूलबसमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झालेला नाही तर तिचा विनयभंग दिलं आहे, असं स्पष्टीकरण पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी म्हटलंय. गुन्हा नोंदवून घेताना पोलिसांनी चुकून ३७६ हे बलात्काराचं कलम लावलं, अशी माहिती त्यांनी दिलीय.

जुहू भागातील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या अजून धड बोलताही येत नसणाऱ्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलीय. या प्रकरणात संबंधित स्कूलबस क्लिनरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. कोर्टासमोर हजर केल्यानंतर या क्लिनरला एक फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

या प्रकरणात लावण्यात आलेलं बलात्काराचं कलम काढून विनयभंगाचं कलम लावण्यात येणार आहे. कोर्टात हे कलम बदलण्यात येईल, अशी माहिती सिंग यांनी दिलीय.