आता मिळणार पाच किलोची एलपीजी सिलिंडर्स

सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू विपणन कंपनी इंडियन ऑईलनं पाच किलो वजनाच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर विक्रीचा शुभारंभ आज मुंबई परिसरातून केला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 2, 2014, 07:37 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सार्वजनिक क्षेत्रातील तेल आणि वायू विपणन कंपनी इंडियन ऑईलनं पाच किलो वजनाच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर विक्रीचा शुभारंभ आज मुंबई परिसरातून केला.
कंपनीच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे कार्यकारी संचालक जी. तिवारी यांच्या हस्ते नवी मुंबईतील मे. न्यू बॉम्बे पेट्रोलियम फ्युएल स्टेशन इथं बाजारभावाप्रमाणं कमी आकारातील गॅस सिलिंडर उपलब्ध होण्याचा मार्ग यामुळं उपलब्ध झाला. शंकर शरण, श्याम बोहरा, बी. के. सिंह, वरदाचारी हे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी एका महिलेला सिलेंडर देऊन याचं उद्घाटन करण्यात आलं. या इंधन भरणा केंद्रावर सिलेंडर रिफील करण्याचीही सोय आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीच्या या उपक्रमाची सुरुवात मुंबईसह दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरू इथं होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.