मुंबई महापालिका तिरोजीच्या चाव्या कोणाकडे?

महापौरपदाच्या निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता लागली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 9, 2017, 11:46 PM IST
मुंबई महापालिका तिरोजीच्या चाव्या कोणाकडे? title=

मुंबई : महापौरपदाच्या निवडणुकीनंतर आता मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता लागली आहे. 

शिवसेनेने स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली असून यापैकीच एकाची अध्यक्षपदी निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदाच्या रेसमध्ये शिवसेनेतून मंगेश सातमकर, आशिष चेंबूरकर आणि रमेश कोरगावकर यांची नावे आघाडीवर आहेत. 

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरले जाणार असून मंगळवारी 14 मार्चला ही निवड होणार आहे. त्यामुळं आज स्थायी समिती अध्यक्षपदाचा उमेदवार आज ठरण्याची शक्यता आहे. 

भाजपने महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं विविध समित्यांच्या निवडणुकांमध्येही ते सेनेच्या पाठिशी राहणारेत, त्यामुळं शिवसेना बिनधास्त आहे.