मुंबईत ऑनलाईन गंडा, बँकेलाच १४ लाखांला फसविले

मुंबई पोलीसांनी गोरखपुरवरुन अशा एका टोळीला अटक केलीये, ज्या तरुणांच्या टोळीनं ऑनलाईन खरेदी करुन नेव्हीनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला जवळपास १४ लाख रुपयांचा गंडा घातलाय. बँक खात्यांची माहिती चोरुन या टोळक्यानं ही ऑनलाईन फसवणूक केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 1, 2014, 01:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई पोलीसांनी गोरखपुरवरुन अशा एका टोळीला अटक केलीये, ज्या तरुणांच्या टोळीनं ऑनलाईन खरेदी करुन नेव्हीनगर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाला जवळपास १४ लाख रुपयांचा गंडा घातलाय. बँक खात्यांची माहिती चोरुन या टोळक्यानं ही ऑनलाईन फसवणूक केलीय.

अॅपलचा आयपॅड, सॅमसंगचा स्मार्टफ़ोन, ब्रँडेड शर्टस, ब्रँडेड शुज आणि यांसारख्या तब्बल १४ लाख रुपयांच्या ब्रँडेड वस्तू गोरखपुरमध्ये राहणा-या या चार तरुणांनी ऑनलाईन फसवणूक करुन खरेदी केल्यात. मुंबईतील नेव्हीनगरमध्ये असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेतल्या ६० बँक खात्यातून त्यांनी या वस्तू चलाखीनं खरेदी केल्यात. बँकेच्या एका छोट्याशा चुकीचा वापर करत या चार तरुणांनी ही खरेदी केलीय.

कृष्णा पांडेला बॅँकेच्या चुकीचा सुगावा सर्वप्रथम लागला.त्यानंतर त्यानं जलजकुमार शुक्ला, हरिओम पांडे, बीपीन यादव आणि सोनू यादव या चार तरुणांच्या मदतीनं ऑनलाईन खरेदी करायला सुरुवात केली. फक्त ऐशो आरामासाठी त्यांनी या वस्तू खरेदी केल्या होत्या.
विशेष म्हणजे पोलीस हवालदार नवनाथ वेताळे यांच्या हुशारीने ऑनलाईन फसवणूक करणारे हे आरोपी पोलीसांच्या हाती लागलेत. या चार तरुणांच्या फोन कॉल्सवर लक्ष ठेवत सोनू यादव या आरोपी यांचा खरा नंबर वेताळे यांनी शोधून काढला आणि पोलीस या आरोपीपर्यंत पोहचले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.