मुंबई : दुचाकी तसंच चार चाकी गाड्या आपल्या ताफ्यात असणाऱ्या मुंबईकरांना आता गाडी पार्किंगसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.
मुंबई महानगरपालिका सभागृहात नव्या पार्किंग धोरणाला मंजुरी देण्यात आलीय. सामान्य विभाग, व्यापारी, बिनव्यापारी विभाग, महत्त्वाचे विभाग अशा गटांत पार्किंग दरांची विभागणी झालीय.
त्यानुसार, सामान्य विभागातल्या पार्किंगमधल्या दरात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय तर व्यापारी विभागातल्या पार्किंग दरात दोन टक्क्यांची वाढ झालीय.
तसंच शहर आणि उपनगरासाठी पार्किंगकरता वेगळे दर आकारले जाणारेत. दरम्यान या दरवाढीला विरोधकांनी हरकत घेत सभात्याग केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.