आता, अनुदानित सिलिंडरसाठीही मोजा संपूर्ण किंमत!

येत्या एक जानेवारीपासून घरगुती गॅसच्या ग्राहकांना अनुदानित सिलिंडरही पूर्ण किंमतीत घ्यावा लागणार आहेत. कारण अनुदानित असलेल्या पहिल्या १२ सिलिंडर्सच्या अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

Updated: Dec 5, 2014, 09:25 PM IST
आता, अनुदानित सिलिंडरसाठीही मोजा संपूर्ण किंमत! title=

मुंबई : येत्या एक जानेवारीपासून घरगुती गॅसच्या ग्राहकांना अनुदानित सिलिंडरही पूर्ण किंमतीत घ्यावा लागणार आहेत. कारण अनुदानित असलेल्या पहिल्या १२ सिलिंडर्सच्या अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

यासाठी आता सर्व गॅस ग्राहकांनी आपापले खाते क्रमांक आपल्या डिस्ट्रिब्युटरकडे द्यायचे आहेत. दरवर्षी, शेकडो कोटींचा होणारा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्यांनी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक वापरण्याचं ठरवलंय. 

प्रत्येक ग्राहकाच्या मोबाईलवर सध्या गॅस कंपन्यांकडून एसएमएस केला जातो. यातून अधिकृत बँक खाते क्रमांक देण्याचं आवाहन करण्यात आलंय.  

येत्या एक जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी होणार असून यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.  

या योजनेमुळे गॅस सिलेंडरचा होणारा काळा बाजार थांबण्यास मदत होणार असून गॅस कंपन्याचा तोटाही कमी होणार आहे. 

विशेष म्हणजे हे अनुदान मिळवण्यासाठी  आधारकार्ड क्रमांक बंधनकारक नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.