पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, विमानतळावर मोदी यांचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी मोदी यांचे विमानतळावर आगमन होताच राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.

Updated: Dec 24, 2016, 11:56 AM IST
पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, विमानतळावर मोदी यांचे स्वागत title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी मोदी यांचे विमानतळावर आगमन होताच राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.

मोदी मुंबई आणि पुणे दौ-यावर असून यावेळी ३६०० कोटी खर्च करुन अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या शिवस्मारकाचं भूमीपूजन करणार आहेत. दरम्यान शिवस्मारकाच्या भूमीपूजनावरुन शिवसेना नाराज असली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातारवण आहे. दरम्यान, मुंबईत शहरात भगवेमय वातारण दिसत आहे. भाजप आणि शिवसेनेने आपल्या पक्षाचे झेंडे लावून जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सरकारचा कार्यक्रम असल्याचे म्हटले असले तरी भाजपने शक्तीप्रदर्शन केलेले दिसून येत आहे.